'नटले तुमच्यासाठी' : शृंगारिक लावणीची दिलखेचक अदा
सर्व सामाजिक स्तरांतले त्यांचे प्रेक्षक पाहिले की, हरिवंशराय बच्चनजींच्या मधुशालेची आठवण झाल्यावाचून राहत नाही… "रंक राव में भेद हुआ है कभी नहीं मदिरालय में, साम्यवाद की प्रथम प्रचारक है यह मेरी मधुशाला..." 'प्रेक्षकांतल्या प्रत्येक पुरुषाला जेव्हा असं वाटेल की, स्टेजवर नाचणारी बाई फक्त आपल्यासाठी नाचतेय, तेव्हा ती खरी लावणी', अशा शब्दांतून मोहनाबाई व्यक्त होतात.......